छत्रपती शाहू महाराज
छत्रपती शाहू महाराज जन्म शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव तर आईचे नाव राधाबाई होते. त्यांचे मूळ नाव यशवंत असे होते. 1889 ते 1893 या चार वर्षाच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक व शारीरिक विकास झाला. एक एप्रिल 1891 रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू महाराजांचा विवाह झाला. त्यावेळी त्यांचे वय 17 वर्षे होते. शैक्षणिक कार्य शाहू महाराजांनी शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले मुलींचे शिक्षण व्हावे म्हणून त्यांनी राजाने काढले 1919 साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगवेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली जातिभेद दूर करण्यासाठी आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला 1917 साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा केला. शाहू महाराजांनी विविध शैक्षणिक वसतिगृह स्थापन केली. त्यामध्ये व्...