Posts

Showing posts with the label बोधकथा

बोधकथा म्हातारीची गोष्ट

        म्हातारीची खीर                  एका गावात एक वृद्ध महिला राहत होती.तिच्या कंजुशीची चर्चा गावभर होती. एका मुलाने तिला याबद्दल अद्दल घडविण्याचे ठरविले. तो त्या महिलेच्या घरी गेला व तिला तिचा दूरचा नातेवाईक असल्याचे सांगू लागला. तिने त्याला नाते असण्याचे नाकारले. कारण तो तिथे राहिला तर तिला खर्च पडला असता ना. बाहेर खूप पाऊस पडत होता. होय नाही करत किमान पावसाचे कारण सांगत त्या मुलाने तिच्या घरात प्रवेश मिळवला. तिने त्याला घरात प्रवेश तर दिला पण मुलगा काही खायला मागेल म्हणून ती म्हणाली.माझ्याकडे तुला देण्यासारखे काही नाही.तेंव्हा गुपचूप पडून राहा. तेंव्हा तो मुलगा म्हणाला. "आजी मी तुला काहीच खायला मागणार नाही कारण माझ्याकडे जादूची छडी आहे. तिच्या सहाय्याने मला काय पाहिजे ते बनविता येते. तू फक्त मला चूल.पातेले आणि पाणी दे. मी छडीच्या सहाय्याने आज खीर खाणार आहे. पाहिजे तर तुला पण खायला देतो ". महिलेने पण खूप दिवसात खीर खाल्ली नव्हती. त्याने चुलीवर पातेल्यात पाणी टाकून पाणी गरम करायला ठेवले. काही वेळाने आपल्या जवळची छडी का...

बोधकथा शेतकरी आणि देव

              शेतकरी आणि देव एक शेतकरी रोज आपल्या शेतात कष्ट करत असे. एके दिवशी तो देवाकडे गेला आणि म्हणाला, "हे देव, मी खूप कष्ट करतो पण तरीही मला चांगली पिके मिळत नाहीत. कृपा करून मला एक दिवसाच्या साठी तुमची शक्ती द्या आणि मी बघतो की मी काय करू शकतो." देवाला शेतकऱ्याचे म्हणणे आवडले आणि त्याने शेतकऱ्याला एका दिवसासाठी त्याची शक्ती दिली. शेतकऱ्याने पावसाचा योग्य प्रमाणात उपयोग करून घेतला, सूर्यप्रकाशाची योग्य प्रमाणात सोय केली, वारा, पाऊस आणि सगळ्या नैसर्गिक गोष्टींची काळजी घेतली. पण काही महिन्यांनंतर, जेव्हा पीक तयार झाले, तेव्हा त्याला कळले की त्याच्या पिकांना फळ नाही. तो देवाकडे परत गेला आणि विचारले, "हे देव, माझे पीक का फळ नाही आले?" देव म्हणाले, "तू सगळं व्यवस्थित केलेस, पण तू वारा, पाऊस आणि वीज यांचा सामना करायला तयार नव्हतास. हे सगळे नैसर्गिक संकटे पिकांना अधिक ताकदवान बनवतात. त्यांना तग धरण्याची ताकद देतात. फक्त चांगल्या गोष्टींनीच नाही तर वाईट गोष्टींनीही आपल्याला शिकवले पाहिजे."

शहाणा आणि मूर्ख कुत्रा

              शहाणा आणि मूर्ख कुत्रा एके गावात एक शहाणा कुत्रा आणि एक मूर्ख कुत्रा राहायचा. मूर्ख कुत्रा नेहमीच इतरांवर भुंकत असे आणि त्यांना त्रास देत असे. शहाणा कुत्रा नेहमी शांतपणे त्याला दुर्लक्ष करत असे. एकदा गावात एक मोठा माणूस आला. त्याच्या हातात मोठी लाठी होती. मूर्ख कुत्रा नेहमीप्रमाणे त्याच्यावर भुंकायला लागला. मोठ्या माणसाने लाठीनं त्याला मारलं आणि तो कुत्रा जखमी झाला. शहाण्या कुत्र्याने हे बघितलं आणि त्याने त्या माणसाला शांतपणे बघितलं, पण भुंकला नाही. मूर्ख कुत्रा शहाण्याला म्हणाला, "तू का भुंकला नाहीस?" शहाणा कुत्रा म्हणाला, "तू आपल्या रागात आणि मूर्खपणात भुंकला आणि मार खाल्लास. मी शांत राहिलो आणि सुरक्षित राहिलो.  तात्पर्य- नेहमीच विचारपूर्वक वागायला पाहिजे."

बोधकथा अंधमाणुस आणि दिवा

          अंध माणूस आणि दिवा एकदा एक अंध माणूस रात्रीच्या वेळी आपल्या हातात दिवा धरून रस्त्यावर चालत होता. एका माणसाने त्याला विचारले, "तू अंध आहेस, मग दिवा का धरलायस?" अंध माणूस हसून म्हणाला, "हा दिवा माझ्यासाठी नाही, तर तुझ्यासाठी आहे. मी अंध आहे, मला काही फरक पडत नाही, पण तु मला अंधारात बघू शकणार नाहीस. हा दिवा मला सुरक्षित ठेवण्यासाठी आहे." या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की आपण आपल्या कृतींनी इतरांना मदत करू शकतो, आणि तेवढेच महत्त्वाचे आहे. ही  बोधकथा आपल्या जीवनातील अनेक गोष्टी शिकवतात. कठिन प्रसंगातून शिकण्याची तयारी, शहाणपणा आणि इतरांच्या दृष्टीकोनातून विचार करण्याची महत्त्वाची गोष्ट.

बोधकथा दोन बेडूक

Image
              मराठी बोधकथा : दोन बेडूक एका गावात दोन बेडूक राहत होते. एके दिवशी दोघेही भटकत असताना ते एका दुधाच्या घड्यात पडले. घडा खोल होता आणि दोघेही बेडूक वर येण्यासाठी धडपडत होते. पहिला बेडूक म्हणाला, "हे अशक्य आहे. आपण या घड्यातून कधीच बाहेर पडू शकणार नाही." त्याने शेवटी हार मानली आणि बुडून मेला.  दुसरा बेडूक मात्र म्हणाला, "माझं हरणं मंजूर नाही. मी शेवटपर्यंत लढेन." तो पाय मारत राहिला. काही वेळाने त्याला लक्षात आलं की त्याच्या पाय मारण्याने दूध दह्याचं रूप घेऊ लागलं आहे. त्याने अजून पाय मारले आणि त्या दह्यामुळे तो वर आला. अखेर तो बाहेर पडला आणि त्याचे प्राण वाचले.  शिकवण: आपण हार न मानता प्रयत्न करत राहिलं तर अशक्य गोष्टही शक्य होते. संकटांच्या वेळी धैर्य न गमावता प्रयत्नशील राहणं महत्त्वाचं असतं.

बोधकथा अपेक्षा

  बोधकथा  अपेक्षा    एकदा एक राजा हिवाळ्याच्या संध्याकाळी आपल्या राजवाड्यात प्रवेश करत असताना त्याला एक वृद्ध द्वारपाल दिसला जो अतिशय जुन्या आणि फाटलेल्या गणवेशात राजवाड्याच्या मुख्य दरवाजावर पहारा देत होता. राजाने आपला घोडा दरबारा जवळ थांबवला आणि त्याला विचारले... "तुला थंडी नाही वाजत... या फाटक्या कपड्यात रात्र कशी घालवता?" व्दारपालने उत्तर दिले... थंडी खूप वाजत आहे महाराज ! पण मी काय करू, माझ्याकडे उबदार कपडे नाहीत, म्हणून मला ते बळजबरीने सहन करावे लागेल, दुसरा पर्याय नाही... आणि कर्तव्य करावेच लागेल, नाहीतर कसे जगणार?" राजाचे मन दुखू लागले आणि या म्हाताऱ्याचे काय करावे असा विचार तो करू लागला. काहीतरी विचार करून राजा म्हणाला, "काळजी करू नकोस... मी ताबडतोब राजवाड्यात जातो आणि माझे काही उबदार कपडे तुमच्यासाठी पाठवतो... तुम्ही अजून थोडा वेळ थांबा..."     द्वारपाल खूप आनंदी झाला आणि त्याने राजाला मनापासून नमस्कार केला आणि त्याच्याबद्दल कृतज्ञता आणि निष्ठाही व्यक्त केली. पण... राजवाड्यात प्रवेश करताच तो आपल्या राणी आणि मुलांशी गप्पा मारण्यात गुंतला आणि काही व...

मराठी_बोधकथा आळशी शाम

आजचा सुविचार - राग बुद्धीचा विनाशक असतो. बोधकथा -  आळशी शाम शाम नावाचा एक मुलगा होता तो खूपच आळशी होता, त्याला त्याचे कपडे बदलण्याची तसदीही येत नव्हती. तो दररोज अंघोळ ही करत नसे.त्याची आई त्याला बळे बळेच अंघोळ घाली. तो सारखा मोबाईल वर गेम खेळत बसे.     एके दिवशी त्यांनी पाहिले की त्यांच्या अंगणातील सफरचंदाचे झाड फळांनी भरलेले आहे. त्याला काही सफरचंद खायचे होते पण झाडावर चढून फळे घेण्यास तो खूप आळशी होता. म्हणून तो झाडाखाली आडवा झाला आणि फळे पडण्याची वाट पाहू लागला. राहुल खूप भूक लागेपर्यंत वाट पाहत राहिला पण सफरचंद कधीच पडले नाहीत. आळस तुम्हाला काहीच मिळवून देऊ शकत नाही. तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. तात्पर्य -   तुम्हाला कुठेही काहीही मिळवून देऊ  शकत नाही. तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल , तर त्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रमच करावे लागतील.

मराठी_बोधकथा

आजचा सुविचार - सत्कर्माचे फळ नेहमी चांगले मिळते. धूर्त गाढव  सदा नावाचा एक मीठ विकणारा व्यापारी होता.तो दररोज गाढवावर मिठाची पोती घेऊन बाजारात मीठ विकण्यासाठी जात असे. रोज वाटेत त्यांना एक नदी पार करावी लागे. एके दिवशी नदी ओलांडत असताना गाढवाचा पाय घसरला आणि ते अचानक नदीत पडले. आणि मिठाची पोतीही पाण्यात पडली. मीठाने भरलेली पिशवी पाण्यात विरघळली आणि त्यामुळे पिशवी वाहून नेण्याइतकी ती हलकी झाली. वजन हलके झाल्यामुळे गाढव खूप खुश झाले. आता पुन्हा गाढव रोज तीच युक्ती करू लागले, त्यामुळे सदा व्यापाऱ्याला खूप नुकसान सहन करावा लागे. सदाला गाढवाची चाल समजली आणि त्याने त्याला धडा शिकवायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी त्याने कापसाची पिशवी गाढवावर चढवली. आता गाढवाने पुन्हा तीच युक्ती केली. कापसाची पिशवी अजून हलकी होईल अशी त्याला आशा होती. आज मात्र ओला कापूस वाहून नेण्यासाठी जड झाल्याने गाढवाचे हाल झाले. यातून त्यांनी धडा घेतला. त्या दिवसानंतर त्याने कोणतीही चालाकी केली नाही आणि सदा सुखी झाला.

मराठी_बोधकथा कावळा आणि चिमणी

आजचा सुविचार- गरज ही शोधाची जननी आहे .   आजची बोधकथा-चिमणी आणि कावळ्याची गोष्ट एक होती चिमणी व  एक होता कावळा, चिमणीचे घर होते मेणाचे आणि  कावळयाचं घर शेणाचं होतं एक दिवस काय झालं आकाशात मोठे मोठे काळे ढग आले. सोसाटयाचा वारा सुटला आणि मुसळधार पाऊस पडू लागला.  झाडे भिजली. जमिनीवरून धो धो पाणी वहायला लागलं.  कावळयाचे घर होत शेणाचे, ते गेले  पाण्यात वाहून, कावळा काकडला. त्याला थंडी वाजू लागली आता कुठे जाव बर? एवढयात त्याला आठवलं . चिमणीच घर आहे शेजारीच, मग कावळा आला चिमणीकडे.  पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते. 'चिऊताई, चिऊताई, दार उघड !'  चिमणी  म्हणाली 'थांब माझ्या बाळाला अंघोळ घालू दे. चिऊताई, चिऊताई, दार उघड !'  चिमणी  म्हणाली 'थांब माझ्या बाळाला काजळ-पावडर लावते' थोड्या वेळाने चिमणीने दार उघडले कावळा गरठला होता, तो म्हणाला कुठे बसू, चिमणी म्हणाली किचनमध्ये बस. कावळा गेला किचन मध्ये , त्याला दिसली चिमणीच्या बाळाची खीर, त्याने ती खाऊन टाकली. चिमणीने पाहिले .चिमणीला राग आला.चिमणी कावळ्याला म्हणाली तू खीर का खाल्ली. तसा कावळा पळू लाग...

मराठी_बोधकथा|Marathi_stories

आजचा सुविचार - परोपकार हाच खरा परमार्थ आहे  आजची बोधकथा - अतिलोभ        एक रामपूर नावाचे गाव होते.त्या गावात एक भिकारी रहात होता. तो रोज गावात लोकांना भीक मागायचा. मिळेल ते खायचा. काही मिळाले नाही, तर पाणी पिऊन जगायचा. त्याला या जीवनाचा कंटाळा आला होता. त्याला कोणीतरी सांगितले की 'तू गावाबाहेर नदीकाठी शंकराची पुजा कर. तो प्रसन्न होईल आणि तुला श्रीमंत करेल'. तो त्याप्रमाणे करतो. शंकर प्रसन्न होतो. शंकर त्याला म्हणतो, की 'तू तुझी झोळी पुढे कर. मी त्यात पैसे टाकत जाईत. तू जेव्हा थांब म्हणशील, तेव्हा मी थांबेन. मात्र, हे लक्षात ठेव, जर तुझी झोळी फाटली व पैसे खाली पडले तर त्यांची माती होईल. तो भिकारी आपल्या झोळीत मावेल एवढेच पैसे घेतो व त्याला थांबवतो त्या पैशातून तो घर,शेती,गाडी विकत घेतो.तेव्हा त्याला एक शेजारी विचारतो की तू एकदम कसा श्रीमंत झालास? तेव्हा तो त्याला सगळी हकीकत सांगतो. त्या माणसालाही पैशांची हाव सुटते. तो सुध्दा गावाबाहेर जातो. शंकराला प्रसन्न करतो. शंकर त्याच्या झोळीत पैसे टाकायला सुरवात करतो. तो आणखी मागत राहतो. शेवटी पैशाच्या हव्यासापायी थांब म्हण...

16 मराठी_बोधकथा Marathi_Bodh_Katha

आजचा सुविचार - नम्रतेसारखा दुसरा गुण नाही . आजची बोधकथा - सोन्याचा मुकुट आणि चांदीचे पाय एक आटपाट नगर होतं  त्या नगरात माता महालक्ष्मीचे एक मंदिर होते. रोज अनेक भक्त त्या मंदिरात दर्शनासाठी येत असत. हळूहळू मंदिराची ख्याती वाढू लागली, भक्तांची गर्दी होऊ लागली, मंदिराचा विस्तार होऊ लागला मग काही लोकांनी ठरविले महालक्ष्मी मातेला एक सोन्याचा मुकुट करावा. त्यासाठी निधी गोळा करण्याचे ठरविले. गावाच्या बाजूलाच एक अनाथ, अपंग मुलांचा आश्रम होता. त्या आश्रमालाही गावातील काही लोक दानधर्म करत. गावात धनुशेठ नावाचे एक श्रीमंत सावकार राहात होते. धनुशेट आपल्या पैशातून, नफ्यातून काही वाटा हा दानधर्मासाठी वापरत असत. भक्तमंडळींना वाटले की धनुशेटसारखा दिलदार मनाचा माणूस आपल्याला मदत करेल सगळे मिळून धनुशेटकडे गेले. भक्तमंडळीना आपल्या पेढीवर आलेले पाहून धनुशेटला खूप आनंद झाला. त्यांनी भक्तांचा मोठा आदरसत्कार केला. लोकांनी महालक्ष्मी मातेसाठी सोन्याचा मुकुट करण्याचे सांगितले व धनुशेटकडून मदतीची मागणी केली. यावर धनुशेट म्हणाले, "मंडळी मी तुमच्या कामात काही मदत करु शकत नाही कारण मी महालक्ष्मीला सो...

मराठी_बोधकथा|Marathi_bodhkatha 15

  आजचा सुविचार - सत्कार्यापेक्षा सहकार्य महत्वाचे असते.   आजची बोधकथा - बळी तो कान पिळी एक जंगल होतं .त्या जंगलामध्ये खूप प्राणी राहत होते. एकदा त्या जंगलामध्ये भयंकर साथीची लाट सुरू झाली आणि हजारो प्राणी पटापट मारू लागले. त्या प्राण्यांना वाटायला लागलं, की आपण फार पाप केलं, त्यामुळे देवाने कोप केला आणि सर्व प्राणी मरू लागले आहेत.मग आपली वाईट कृत्य कबूल करायचे त्या सर्वांनी ठरवले. आणि जो सर्वात मोठ पाप करेल त्यानं देवाच्या कोपाला शांत करायचं आणि बळी जायचं असं ठरलं मग एक सभा बोलवण्यात आली. सर्वजण त्या सभेसाठी हजर झाले. आता न्यायाधीश कोणाला निवडायचं मग सर्वांनी न्यायाधीश म्हणून एका लांडग्याची निवड केली.प्रथम जंगलचा राजा सिंह त्यांनी पुढे होऊन कबुली दिली. मी फार गरीब शेळ्यांना ,मेंढ्यांना ठार मारल एवढेच नव्हे तर फार भूक लागली म्हणून एका माणसालाही ठार मारून खाल्लं. त्यावर न्यायाधीश महाराज मोठ्या गंभीरतेने म्हणाले सामान्य प्राण्यांनी अशा गोष्टी केल्या असत्या तर नक्कीच मोठा अपराध ठरला असता पण आपण राजे आहात इतरांपेक्षा महाराजांना जास्त सवलती असतात त्यामुळे हा काही मोठा अपराध नाही.या ...

बोधकथा शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ

आजचा सुविचार - उठा जागे व्हा आणि ध्येयपूर्तीवाचून थांबू नका.        आजची  बोधकथा  -  शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ एका जंगलात एक ससा आणि एक वाघ राहत होते. एकदा ससाआरामात गवत खात होता. समार वाघ येऊन उभा राहिला तरी त्याला समजले नाही. वाघाच्या आवाजाने  त्याला भान आले. वाघाच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी तो विचार करू लागला. वाघ आपल्यापेक्षा ताकदवान आहे. आपण त्याच्याशी भांडू शकत नाही. तेव्हा युक्ती वापरलेलीच बरी, असे त्याला वाटले. ससा वाघाला म्हणाला, "वाघोबादादा, पलीकडे एक हरिण चरत आहे. मला खाऊन तुमचे पोट भरणार नाही.' हे ऐकून वाघ खूश झाला. सावकाश पावले टाकीत तो थोडा पुढे गेला व हरिणाचा • कानोसा घेऊ लागला. ही संधी साधत ससा आवाज न करता आपल्या बिळाकडे गेला. बिळात सुरक्षित पोहोचताच सशाने विचार केला, 'वाघ युक्तीला फसला हे बरे झाले. आपल्याकडे वाघाएवढी शक्ती तरी कुठाय !