मराठी_बोधकथा|Marathi_stories

आजचा सुविचार - परोपकार हाच खरा परमार्थ आहे 


आजची बोधकथा - अतिलोभ

       एक रामपूर नावाचे गाव होते.त्या गावात एक भिकारी रहात होता. तो रोज गावात लोकांना भीक मागायचा. मिळेल ते खायचा. काही मिळाले नाही, तर पाणी पिऊन जगायचा. त्याला या जीवनाचा कंटाळा आला होता. त्याला कोणीतरी सांगितले की 'तू गावाबाहेर नदीकाठी शंकराची पुजा कर. तो प्रसन्न होईल आणि तुला श्रीमंत करेल'. तो त्याप्रमाणे करतो. शंकर प्रसन्न होतो.


शंकर त्याला म्हणतो, की 'तू तुझी झोळी पुढे कर. मी त्यात पैसे टाकत जाईत. तू जेव्हा थांब म्हणशील, तेव्हा मी थांबेन. मात्र, हे लक्षात ठेव, जर तुझी झोळी फाटली व पैसे खाली पडले तर त्यांची माती होईल. तो भिकारी आपल्या झोळीत मावेल एवढेच पैसे घेतो व त्याला थांबवतो

त्या पैशातून तो घर,शेती,गाडी विकत घेतो.तेव्हा

त्याला एक शेजारी विचारतो की तू एकदम कसा श्रीमंत झालास? तेव्हा तो त्याला सगळी हकीकत सांगतो. त्या माणसालाही पैशांची हाव सुटते. तो सुध्दा गावाबाहेर जातो. शंकराला प्रसन्न करतो. शंकर त्याच्या झोळीत पैसे टाकायला सुरवात करतो. तो आणखी मागत राहतो. शेवटी पैशाच्या हव्यासापायी थांब म्हणायचे विसरतो. त्यामुळे त्याच्या झोळीवर त्या पैशांचा ताण पडतो आणि ती फाटते. सर्व पैसे खाली पडतात व त्यांची माती होते. त्याचबरोबर शंकरही नाहीसा होतो. त्याच्यापाशी रडण्याशिवाय काहीच उरत नाही. 

तात्पर्य - अतिलोभ माणसाला भिकारी बनवतो

Comments

Popular posts from this blog

रंगांची नावे