मराठी_बोधकथा कावळा आणि चिमणी
आजचा सुविचार-गरज ही शोधाची जननी आहे.
आजची बोधकथा-चिमणी आणि कावळ्याची गोष्ट
एक होती चिमणी व एक होता कावळा,चिमणीचे घर होते मेणाचे आणि कावळयाचं घर शेणाचं होतं
एक दिवस काय झालं आकाशात मोठे मोठे काळे ढग आले. सोसाटयाचा वारा सुटला आणि मुसळधार पाऊस पडू लागला.
झाडे भिजली. जमिनीवरून धो धो पाणी वहायला लागलं.
कावळयाचे घर होत शेणाचे, ते गेले पाण्यात वाहून, कावळा काकडला. त्याला थंडी वाजू लागली आता कुठे जाव बर? एवढयात त्याला आठवलं .
चिमणीच घर आहे शेजारीच, मग कावळा आला चिमणीकडे.
पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते. 'चिऊताई, चिऊताई, दार उघड !'
चिमणी म्हणाली 'थांब माझ्या बाळाला अंघोळ घालू दे.
चिऊताई, चिऊताई, दार उघड !'
चिमणी म्हणाली 'थांब माझ्या बाळाला
काजळ-पावडर लावते' थोड्या वेळाने चिमणीने दार उघडले
कावळा गरठला होता, तो म्हणाला कुठे बसू, चिमणी म्हणाली किचनमध्ये बस.
कावळा गेला किचन मध्ये , त्याला दिसली चिमणीच्या बाळाची खीर, त्याने ती खाऊन टाकली.
चिमणीने पाहिले .चिमणीला राग आला.चिमणी कावळ्याला म्हणाली तू खीर का खाल्ली. तसा कावळा पळू लागला.चिमणीने मग चुलीतील जळके लाकूड फेकून मारले तशी कावळ्याची शेपूट जळाली.
Comments
Post a Comment