मराठी_बोधकथा|Marathi_bodhkatha 15

 आजचा सुविचार - सत्कार्यापेक्षा सहकार्य महत्वाचे असते.

  आजची बोधकथा - बळी तो कान पिळी



एक जंगल होतं .त्या जंगलामध्ये खूप प्राणी राहत होते. एकदा त्या जंगलामध्ये भयंकर साथीची लाट सुरू झाली आणि हजारो प्राणी पटापट मारू लागले. त्या प्राण्यांना वाटायला लागलं, की आपण फार पाप केलं, त्यामुळे देवाने कोप केला आणि सर्व प्राणी मरू लागले आहेत.मग आपली वाईट कृत्य कबूल करायचे त्या सर्वांनी ठरवले. आणि जो सर्वात मोठ पाप करेल त्यानं देवाच्या कोपाला शांत करायचं आणि बळी जायचं असं ठरलं मग एक सभा बोलवण्यात आली. सर्वजण त्या सभेसाठी हजर झाले. आता न्यायाधीश कोणाला निवडायचं मग सर्वांनी न्यायाधीश म्हणून एका लांडग्याची निवड केली.प्रथम जंगलचा राजा सिंह त्यांनी पुढे होऊन कबुली दिली. मी फार गरीब शेळ्यांना ,मेंढ्यांना ठार मारल एवढेच नव्हे तर फार भूक लागली म्हणून एका माणसालाही ठार मारून खाल्लं. त्यावर न्यायाधीश महाराज मोठ्या गंभीरतेने म्हणाले सामान्य प्राण्यांनी अशा गोष्टी केल्या असत्या तर नक्कीच मोठा अपराध ठरला असता पण आपण राजे आहात इतरांपेक्षा महाराजांना जास्त सवलती असतात त्यामुळे हा काही मोठा अपराध नाही.या निकालामुळे सर्व प्राण्यांनी लांडग्याची वाहवा केली.यानंतर अस्वल,चित्ता, वाघ सर्व प्राण्यांनी आपापल्या कबुली दिल्या. लांडग्याने सर्वांचा निकाल दिला आणि सर्वांना माफ करून टाकलं शेवटी एक गाढव पुढे आलं ते म्हणाले मी एका शेतकऱ्याच्या जमिनीतलं एक पेंढी भरून हिरवं गवत खाल्लं आणि म्हणून मला पश्चाताप होते त्यावर न्यायाधीश महाराज कडाडले अरे तू खूप मोठे पाप केले तुझ्या पापा मुळेच हा सध्या साथीचा रोग पसरलेला आहे याला ठार मारण्याची शिक्षा दिलीच पाहिजे असा निकाल लांडग्याने दिल्याबरोबर सगळ्यांनी त्याला ठार मारलं बिचाऱ्या गाढवाला ठार मारून टाकलं. 

तात्पर्य - बळी तो कान पिळी

Comments

Popular posts from this blog

रंगांची नावे