बोधकथा शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ
आजचा सुविचार - उठा जागे व्हा आणि ध्येयपूर्तीवाचून थांबू नका. आजची बोधकथा - शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ एका जंगलात एक ससा आणि एक वाघ राहत होते. एकदा ससाआरामात गवत खात होता. समार वाघ येऊन उभा राहिला तरी त्याला समजले नाही. वाघाच्या आवाजाने त्याला भान आले. वाघाच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी तो विचार करू लागला. वाघ आपल्यापेक्षा ताकदवान आहे. आपण त्याच्याशी भांडू शकत नाही. तेव्हा युक्ती वापरलेलीच बरी, असे त्याला वाटले. ससा वाघाला म्हणाला, "वाघोबादादा, पलीकडे एक हरिण चरत आहे. मला खाऊन तुमचे पोट भरणार नाही.' हे ऐकून वाघ खूश झाला. सावकाश पावले टाकीत तो थोडा पुढे गेला व हरिणाचा • कानोसा घेऊ लागला. ही संधी साधत ससा आवाज न करता आपल्या बिळाकडे गेला. बिळात सुरक्षित पोहोचताच सशाने विचार केला, 'वाघ युक्तीला फसला हे बरे झाले. आपल्याकडे वाघाएवढी शक्ती तरी कुठाय !