शब्द संपत्ती 2
दृश्य दर्शक शब्द
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
प्राण्यांचे , पक्ष्यांचे, विविध वस्तूंचे असे असंख्य प्रकारचे आवाज आपण ऐकत असतो. काही आवाज गोड, मधुर तर काही आवाज कर्कश, त्राससदायक असतात.
प्राण्यांचे/पक्ष्यांचे आवाज
कबुतराचे - घुमणे
कावळ्याची - कावकाव
कोबडयाचे - आरवणे
कोकिळेचे - कुहूकुहू
गाईचे - हंबरणे
घुबडाचा घुत्कार
चिमणीची- चिवचिव
नागाचा - फूत्कार
पक्ष्यांचे भांडण - कलकलाट
पारव्यांचे- गुटरे घुम
मधमाश्यांचा - गुजाराव
मांजरीचे - म्यांव म्यांव
मोरांचा - केकारव
सापाचे - फुसफुसणे
सिंहाची- गर्जना
म्हशीचे- रेकणे
बेडकाचे- डरावणे
हत्तीचे - चित्कारणे
गाढवाचे -ओरडणे
घोड्याचे - खिंकाळणे
पक्ष्यांची - किलबिल
भुंग्यांचा - गुंजारव
माकडांचा - भुभूः कार
वाघाची - डरकाळी
हंसाचा - कलरव
आगगाडीची - झुकझूकू
ढोलांचा - ढमढम
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
इतर आवाजदर्शक शब्द
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
गाडीचा - खडखडाट
घड्याळाची - टिक टिक
जात्याची - घरघर
घंटेचा- घणघणाट
टाळ्यांचा - कडकडाट
ढगांचा - गडगडाट
तलवारीचा - खणखणाट
पक्ष्यांचा - किलबिलाट
ताशाची - तडतड
नाण्यांचा - छनछनाट
पाण्याचा - खळखळाट
पानांची - सळसळ
बांगड्यांचा- किणकिणाट
पैंजणांची - छुमछूम
भांड्याचा - खणखणाट
विजेचा - कडकडाट
विमानाची - घरघर
शस्त्रांचा - खणखणाट
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
दृश्यदर्शक शब्द
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
अश्रूंची घळघळ
तारकांचा चमचमाट रक्ताची भळभळ
दिव्यांचा लखलखाट विजांचा लखलखाट
बातमीची कुणकुण
खालील शब्द वाचा
खळकन फुटणे
मटकन मिळणे
मर्रकन वळणे
टर्रकन फाडणे
पडणे सटकन निसटणे
भुर्रकन् उडणे
मटकन् बसणे
सपकन् वार करणे
शुद्ध व अशुद्ध शब्द
मराठी भाषेमध्ये लेखन करताना व्याकरणाचे जे नियम असतात; ते लक्षात घेऊन लेखन केले तरच ते शुद्धलेखन ठरते.आपण नियम प्रथम अभ्यासूया.
◆ जेव्हा एकाच अक्षराचा शब्द असतो तेव्हा तो नेहमी दीर्घ लिहावा. तसेच शब्दाच्या शेवटी
उकार आल्यास किंवा वेलांटी आल्यास तो दीर्घ लिहावा, जसे एक अक्षरी शब्द- मी, तू जी, ती, धूड.
तसेच-गाडी, माडी, साडी, बयू, आणू, पशू इ. यामध्ये परंतु, आणि, तथापि हे शब्द अपवाद आहेत.
◆जेव्हा शब्दातील अक्षरांचा उच्चार नाकातून केला जातो, त्या अक्षरांवर अनुस्वार दिला जातो उदा :- बंगला, चेंडू, उंच, संसार इ.
◆ जेव्हा शब्द अकारान्त असेल तेव्हा शेवटून दुसरे ( उपांत्य) अक्षर नेहमी दीर्घ लिहावे.
उदा :- रूप,लसूण, मीठ, अरूण, तूप, खीर, भूक इ.
◆ जेव्हा शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्यामागील इकार / उकार हस्व लिहावा. उदा :- गरिबी, वकिली, मैत्रिणी, माहिती इ.
◆'ऋ' हा स्वर आहे, त्याला जोडुन येणारे अक्षर जोडाक्षर नसते. उदा :- वृक्ष, कृपा, मृग, कृष्ण इ. यामध्ये वृ. कृ. गृ ही जोडाक्षरे नाहीत..
◆'क्ष' आणि 'ज्ञ' ही जोडाक्षरे आहेत. उदा :- ज्ञान क्षत्रिय, यज्ञ, पक्षी इ.
◆हळूहळू, मुळूमुळू अशा शब्दातील दुसरे व चौथे अक्षर दीर्घ असते. खाली काही शब्द दिले आहेत त्य अभ्यास केल्यास अशुद्ध शब्द व शुध्द शब्द नीट समजतील.
अशुद्ध शब्द - शुद्ध शब्द
आणी - आणि
सौरक्षण - संरक्षण
परंतू - पंरतु
स्त्रि - स्त्री
आणी - आणि
संगित - संगीत
मि - मी
रवीकिरण - रविकिरण
हळुहळु - हळूहळू
तु - तू
टोपि - टोपी
बहीणी - बहिणी
तु - तू
हुकुम - हुकूम
Worms and insects
Worms and insects
black bee ब्लॅक बी भुंगा
cricket क्रिकेट रातकीडा
Scorpionस्कॉर्पिओन विंचू
caterpillar कटरपीलर सुरवंट
louse लाउज ऊ
firefly फायर फ्लाय
wasp वास्प कुंभारीन
earthworm अर्थवर्म
gad fly गाद फ्लाय
centipede सेंटिफेड घोण
gnat चिलट
Leech लीच जळू
Locust लोकस्त टोळ
moth मॉथ पतंग
flea फ्ली पिसू
grain Moath ग्रेन मोथ पोर किडा
Wild animals
Wild animals
monkey मंकी माकड
elephant एलिफँट हत्ती
tiger टायगर सिंह
Kangaroo कांगारू
deer डिअर हरण
rhinoceros रहायनोसेर्स गेंडा
beer बिअर अस्वल
monkey मंकी माकड
wolf ऊल्फ लांडगा
giraffeजिराफ जिराफ
mongoose मुंगूस मुंगूस
Leopard लेपर्ड बिबटे
Foxफॉक्स कोल्हा
Zebra झेब्रा झेब्रा
bison बायसन गवा
Hyena हायना तरस
Chitta चित्ता चित्ता
Gorilla गोरिला गोरिला
Boar बोअर रानडुक्कर
dinosaurus डायनोसोर्स
Pet animals
Pet animals
Cow काऊ गाय
buffalo बफेलो म्हैस
Ox ऑक्स बैल
cat कॅट मांजर
dog डॉग कुत्रा
Sheep शिप मेंढी
horse हॉर्स घोडा
camel कॅमल उंट
donkey डोंकी गाढव
goat गोट शेळी
pig पिग डुक्कर
Body parts
नवोदय शिष्यवृत्ती तयारी
शरीराचे अवयव वाचा व् पाठ करा .
Body parts
Head (हेड )डोके
ear ( इअर ) कान
tooth ( टूथ ) दात
Neck (नेक ) मान
chest (चेस्ट ) छाती
stomach (स्टमक )पोट
elbow (एल्बो )कोपर
Palm (पाम ) तळ हात
finger ( फिंगर) बोट
leg (लेग ) पाय
ankle(अन्कल ) घोटा
toes (टोज )पंजा
foot (फूट ) पाय
knee (नी ) गुडघा
thumb (थंब ) अंगठा
hand (हैण्ड ) हात
wrist (रिस्ट )मनगट
arm (आर्म) बाहू
shoulder (शोल्डर )खांदा
lip (लिप )ओठ
cheek (चीक) गाल
nose (नोज ) नाक
eye (आय )डोळे
Opposite words
Opposite words
arrival X departureartificial Xnaturalattack × defendbeautiful X uglybefore × afterbegin × endbold× timidbottom × topclean×dirtyComplete × incompleteoptional × compulsorycruel X kinddifficult × easyempty × fullfailure × successfalse X truefast × slowfit × unfitforget × rememberfriend X enemygood ×badhard X softhonest X dishonestdespair × hopeimport X exportsorrow× joylong X shortlose x win

