महिला दिन

              महिला  दिन  भाषण

दरवर्षी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन अर्थात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. महिला दिनानिमित्त अनेकदा शाळेत वक्तृत्व स्पर्धा (भाषण स्पर्धा), निबंध स्पर्धा यांचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत महिला दिनाशी संबंधित माहितीचा आपण उपयोग करू शकता. यासाठीच हे जागतिक महिला दिनाचे
मराठी भाषण...
ज्याला स्त्री आई म्हणून कळली, तो
जिजाऊचा शिवबा झाला ज्याला स्त्री बहिण म्हणून कळली तो
मुक्ताईचा ज्ञानदेव झाला
ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा
श्याम झाला.
इतिहासात डोकावलात तर मार्च 1908 मध्ये न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो महिला कामगारांनी रूटगर्स चौकात जमून
ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा
दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता य
मागण्या केल्या. नंतर 1910 मध्ये "कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या आंदोलनाच्या स्मरणार्थ हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारण्याचा ठराव झाला
शिवरायांच्या स्वराज्य स्थापन
करण्यामागील प्रेरणा असणाऱ्या माता जिजाऊ, स्वातंत्र्याची चेतना देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, आणि स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्व स्त्रियांच्या कार्याला वंदन  करतो.
    स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व
सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करण्यासाठी जागरूकता आणणे, तसेच महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे.
यासाठी एवढेच म्हणेन की,
सामर्थ्याची ओढून ये नवी झालर, स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर !!"
एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.

Comments

Popular posts from this blog

रंगांची नावे