स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंद
मृत्यू : ४/७/१९०२
स्वामी विवेकानंद यांचा जन्म दत्त नावाच्या घराण्यात झाला. विवेकानंदांना लहानपणी वीरेश्वर व नरेंद्र अशी नावे होती. लहानपणापासून त्यांची बुद्धी अत्यंत तल्लख होती. रामकृष्ण परमहंस या गुरूंच्या सहवासात त्यांचे आयुष्यच बदलून गेले. भारतात भूषणभूत असे जे अध्यात्मवादी धोर पुरुष होऊन गेले त्यांत स्वामीविवेकानंदांची गणना होते. पाश्चिमात्य राष्ट्रांना भारतीय संस्कृतीची व हिंदूधर्माची ओळखउकल देणारे ते पहिले भारतीय होत. त्यांनी भारतीय वेदान्ताची पताका जगभर फडकावली.शिकागोच्या सर्वधर्म परिषदेतील त्यांच्या भाषणामुळे त्यांचे नाव प्रसिद्ध झाले. १ मे १८९७ या दिवशी विवेकानंदांनी 'रामकृष्ण मिशन' ही संस्था स्थापन केली. "वा संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली. धर्म, अध्यात्म, तत्त्वज्ञान, भारतीय संस्कृती आणि भारतापुढचे आजचे प्रश्न यांवर त्यांनी दिलेली व्याख्याने आणि वेळोवेळी लिहिलेली पत्रे या सर्वांचा संग्रह विवेकानंद ग्रंथावलीच्या दहा खंडांतील सुमारे तीन हजार पृष्ठांमध्ये समाविष्ट आहे.
Comments
Post a Comment