गुढीपाडवा सणांची माहिती

             *गुढीपाडवा सण माहिती*

   गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो. होळीचे दहन झाल्यानंतर वातावरणातील तापमान वाढू लागते. या वातावरणातील बदलामुळे त्वचेचे विकार, पोटाचे विकार, सर्दी-खोकला आदी आजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा वातावरणात शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि शरीराचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला कडुनिंबाचे
सेवन केले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंब आणि गूळ खाण्याची प्रथा जुन्या काळापासूनच चालत आली आहे.

कडुनिंब आणि गुळात अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत. जे शरीराच्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी फायदेशीर ठरतात , कडुनिंबाचा पाला हा चवीला कडू
असला, तरी शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतो. गुळासोबत कडुनिंबाचा पाला खाल्ल्याने शरीरातील हानिकारक घटक बाहेर काढले जातात.
         *आरोग्यदृष्ट्या महत्त्व*
चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातःकाळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश करणे, त्वचा रोग बरे करणे, धान्यातील क थांबवणे हे आणि असे अनेक औषधी गुण ह्या कडुनिंबाच्या अंगी आहेत असे आयुर्वेदात मानले जाते.) शरीराला थंडावा देणाऱ्या कडूनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते.

          *कृषी विषयक महत्त्व*

डॉ. सरोजिनी बाबर यांच्या मतानुसार गुढीपाडव्यास लोक- संस्कृतीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. भूमी हा जगाचा गर्भाशय, तिच्यात सूर्य बीज पेरतो, वर्षनाच्यामुळे भूमी सुफलित होते.. सर्जनाला मिळणाऱ्या ऊर्जेशी जोडलेला हा एक सण आहे असे लोकसंस्कृतीचे अभ्यासक आवर्जून सांगतात.

Comments

Popular posts from this blog

रंगांची नावे