रवींद्रनाथ टागोर भाषणे

जन्म : ७/५/१८६१
मृत्यू : ७/८/२९४१

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर


गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म कोलकता येथे ७ मे १८६१ रोजी झाला. बंगाली व संस्कृत या भाषांचा अभ्यास त्यांनी घरीच केला. १८८१ मध्ये त्यांनी प्रतिभा' हे पहिले संगीत नाटक लिहिले. 'साधना', 'भारती', 'बंगदर्शन' या मासिकांचे त्यांनी संपादन केले. त्यांचा विवाह मृणालिनी देवीशी झाला.

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे विशाल प्रतिभेचे व व्यापक दृष्टीचे महापुरुष होते. 'गीतांजली' या काव्यग्रंथाला मिळालेल्या नोबेल पारितोषिकामुळे ते विश्वविख्यात झाले. त्याचप्रमाणे 'जन गण मन' या त्यांच्या काव्याला राष्ट्रगीताचा दर्जा 'मिळाल्यामुळे ते 'राष्ट्रकवी' म्हणून ओळखले जातात. रवींद्रबाबूंनी स्थापन केलेल्या 'शांतिनिकेतन' व 'विश्वभारती' या संस्थांनी

शिक्षणक्षेत्रात मोलाचे कार्य केले.

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे कवी, कादंबरीकार, कथाकार, नाटककार, विचारवंत, होते. 'रवींद्रसंगीत' ही त्यांची भारतीय संगीताला देणगी आहे.

Comments

Popular posts from this blog

रंगांची नावे