वि. दा. सावरकर

जन्म : २८/५/१८८३
मृत्यू : २६/२/१९६६

वि. दा. सावरकर


स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म नाशिक जिल्ह्यात मगर येथे झाला. बी.ए. झाल्यावर शिष्यवृत्ती मिळवून ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध क्रांतिकारक, हिंदुमहासभेचे राजकीय पुढारी व बुद्धिवादी सुधारक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ब्रिटिश राजसलेविरुद्धच्या चळवळीत भाग घेतल्याच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा झाली. नाशिक कटात भाग घेतल्याच्या आरोपावरून १९१० मध्ये त्यांना ५० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यांना लंडनहून भारतात आणण्यात येत असताना मार्सेलिस बंदराजवळ आगबोटीच्या पोर्ट होलमधून उडी मारून ते फ्रान्सच्या किनाज्यावर पोहत गेले. त्यांची ही उडी त्रिखंडात गाजलेली आहे.
अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना, विदेशी कपड्यांची होळी, १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचा इतिहास, इटलीचा स्वातंत्र्यवीर जोसेफ मॅझिनी यांचे चरित्र, सामाजिक सुधारणा चळवळी, साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद या सावरकरांच्या जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी होत.

Comments

Popular posts from this blog

रंगांची नावे