नेताजी सुभाषचंद्र बोस

जन्म : २३/१/१८९७
मृत्यू : १८/८/१९४५

नेताजी सुभाषचंद्र बोस

नेताजींचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी उडीसा राज्यातील कटक येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव सुभाषचंद्र जानकीनाथ बोस होते. रामकृष्ण परमहंस व विवेकानंद यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. स्कॉटिश चर्च कॉलेजातून ते पहिल्या वर्गात बी.ए. झाले. वडिलांच्या इच्छेनुसार इंग्लंडला जाऊन ते आय.सी.एस. झाले. परकीय राज्यकर्त्यांच्या हाताखाली नोकरी करावी लागणार हे लक्षात येताच त्यांनी राजीनामा दिला व ते भारतात परत आले.

जर्मनी आणि जपान या देशांशी संधान सांधून त्यांनी सिंगापूर येथे 'आझाद हिंद सेनेचे' नेतृत्व स्वीकारले. 'चलो दिल्ली' व 'जयहिंद' या दोन घोषणा त्यांनी आपल्या सैन्याला दिल्या. ते 'नेताजी' म्हणून ओळखले जाऊ लागले.

१९३८ व १९३९ मध्ये झालेल्या हरिपुरा व त्रिपुरा या काँग्रेस अधिवेशनांचे ते अध्यक्ष होते. पुढे त्यांनी 'फॉरवर्ड ब्लॉक' नावाचा पक्ष काढला. देशभक्ती, धडाडी, संघटन कौशल्य, समयसूचकता व मुत्सद्देगिरी हे गुण त्यांच्या अंगी होते.


Comments

Popular posts from this blog

रंगांची नावे