कर्मवीर भाऊराव पाटील karmaveer bhaurao patil

 कर्मवीर भाऊराव पाटील

कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कुंभोज या गावी 22 सप्टेंबर 1887 रोजी झाला.त्यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगोंडा पाटील असे होते.त्यांच्या वडिलांचे नाव पायगोंडा पाटील तर आईचे नाव गंगाबाई असे होते.
भाऊरावांचे  प्राथमिक शिक्षण कुंभोज दहिवडी विटे इत्यादी ठिकाणी झाले. 
    पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात  आले.  त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यातआली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा  कार्याचा प्रभाव पडला. पुढील काळात भाऊराव पाटील साताऱ्यात जाऊन शिकवू घेऊ लागले.
सातारा जिल्ह्यातील काले या गावी दिनांक ४ ऑक्टोबर १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.
भाऊरावांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय तसेच पुढे इ.स. १९५५ मध्ये साताऱ्यात मौलाना आझाद यांच्या नावाने आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सुरू केले.

मृत्यू -  9 मे 1959 रोजी पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये झाले.


Comments

  1. Shikshan mahrshi karmveer Bhaurao patil yanchya jivnavar Sundar lekh...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

रंगांची नावे