मराठी_बोधकथा कबुतर आणि मुंगी
आजचा सुविचार-जो काळानुसार बदलतो तोच प्रगती करतो.
एका जंगलात एक कबुतर आणि एक मुंगी राहत होते.एकदा काय झालं,मुंगी पाणी पिण्यासाठी तळ्याकाठी गेली आणि पाय घसरून तळ्यात पडली.तिला पोहता येत नव्हते त्यामुळे ती गटांगळ्या खाऊ लागली आता मुंगी पाण्यात बुडणार इतक्यात तळ्याकाठी असलेल्या झाडावर बसलेल्या काबूतराने हे सर्व पाहिले.त्याने झाडाचे एक पान तोडले आणि मुंगी जवळ टाकले चटकन मुंगी त्या पानावर चढली आणि तळ्याकाठी आली.आल्याबरोबर तिने कबुतराचे आभार मानले.
असेच काही दिवस गेल्या नंतर कबुतर झाडावर बसले होते आणि तेवढ्यात एक शिकारी आला त्याने आपल्या बंदुकीचा नेम काबूतरावर धरला .ही सर्व गोष्ट मुंगीने पहिली .शिकारी गोळी झाडणार एवढ्यात मुंगीने त्याच्या पायाचा कडकडून चावा घेतला .बिचाऱ्या शिकार्याचा नेम चुकला.ठो अवाज झाल्यावर कबुतर ही भुर्रकन उडून गेले.आणि अशा प्रकारे इवल्याशा मुंगीने कबुतराचा जीव वाचवला.
तात्पर्य - मैत्री असावी तर अशी.
Comments
Post a Comment