Posts

Showing posts from July, 2023

मराठी-वाचन अक्षरगट 2

  अक्षर गट 2 क  म  ल  अ  आ   ा   ब  घ  र  इ ि  ई ी  या अक्षरांपासून तयार होणारे शब्द घर  बघ  रमा  बाबा  आई घाई  माई  लीला  काकी  आली   मामी  अकरा  बालक  माघार  रिकामा आरमार  घाबरला  बिरबल  किरकिर किलबिल आमराई  घाबरली वाचनपाठ कमला कमला आली. कामाला आली. कमलाबाई घर बघ. कमलाबाई काम कर.

मराठी वाचन अक्षर गट 1

 अक्षर गट 1 क  म  ल  अ  आ   ा    या अक्षरांपासून तयार होणारे शब्द काम  माल  लाल आम  कला मला मका आला काका माला लाला मामा कलम मलम कमल कलाम कमाल कलाल कमला मालक आलम कलकल मालामाल

मराठी_बोधकथा कबुतर आणि मुंगी

आजचा सुविचार -जो काळानुसार बदलतो तोच प्रगती करतो .        मराठी बोधकथा -  कबुतर आणि मुंगी  एका जंगलात एक कबुतर आणि एक मुंगी राहत होते.एकदा काय झालं,मुंगी पाणी पिण्यासाठी तळ्याकाठी गेली आणि पाय घसरून तळ्यात पडली.तिला पोहता येत नव्हते त्यामुळे ती गटांगळ्या खाऊ लागली आता मुंगी पाण्यात बुडणार इतक्यात तळ्याकाठी असलेल्या झाडावर बसलेल्या काबूतराने हे सर्व पाहिले.त्याने झाडाचे एक पान तोडले आणि मुंगी जवळ टाकले चटकन मुंगी त्या पानावर चढली आणि तळ्याकाठी आली.आल्याबरोबर तिने कबुतराचे आभार मानले. असेच काही दिवस गेल्या नंतर कबुतर झाडावर बसले होते आणि तेवढ्यात एक शिकारी आला त्याने आपल्या बंदुकीचा नेम काबूतरावर धरला .ही सर्व गोष्ट मुंगीने पहिली .शिकारी गोळी झाडणार एवढ्यात मुंगीने त्याच्या पायाचा कडकडून चावा घेतला .बिचाऱ्या शिकार्याचा नेम चुकला.ठो अवाज झाल्यावर कबुतर ही भुर्रकन उडून गेले.आणि अशा प्रकारे इवल्याशा मुंगीने कबुतराचा जीव वाचवला. तात्पर्य - मैत्री असावी तर अशी.

मराठी_बोधकथा कावळा आणि चिमणी

आजचा सुविचार- गरज ही शोधाची जननी आहे .   आजची बोधकथा-चिमणी आणि कावळ्याची गोष्ट एक होती चिमणी व  एक होता कावळा, चिमणीचे घर होते मेणाचे आणि  कावळयाचं घर शेणाचं होतं एक दिवस काय झालं आकाशात मोठे मोठे काळे ढग आले. सोसाटयाचा वारा सुटला आणि मुसळधार पाऊस पडू लागला.  झाडे भिजली. जमिनीवरून धो धो पाणी वहायला लागलं.  कावळयाचे घर होत शेणाचे, ते गेले  पाण्यात वाहून, कावळा काकडला. त्याला थंडी वाजू लागली आता कुठे जाव बर? एवढयात त्याला आठवलं . चिमणीच घर आहे शेजारीच, मग कावळा आला चिमणीकडे.  पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते. 'चिऊताई, चिऊताई, दार उघड !'  चिमणी  म्हणाली 'थांब माझ्या बाळाला अंघोळ घालू दे. चिऊताई, चिऊताई, दार उघड !'  चिमणी  म्हणाली 'थांब माझ्या बाळाला काजळ-पावडर लावते' थोड्या वेळाने चिमणीने दार उघडले कावळा गरठला होता, तो म्हणाला कुठे बसू, चिमणी म्हणाली किचनमध्ये बस. कावळा गेला किचन मध्ये , त्याला दिसली चिमणीच्या बाळाची खीर, त्याने ती खाऊन टाकली. चिमणीने पाहिले .चिमणीला राग आला.चिमणी कावळ्याला म्हणाली तू खीर का खाल्ली. तसा कावळा पळू लाग...