Ahilyadevi_holkar|लोकमाता_महाराणी_अहिल्यादेवी_होळकर
लोकमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर अहिल्यादेवींचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चौंड़ी येथे ३१ मे १७२५ रोजी झाला. तर निर्वाण १३ ऑगस्ट १७९५ रोजी झाले. त्या सुभेदार मल्हारराव होळकरांच्या सुनबाई म्हणजे राजे खंडेराव यांच्या पत्नी होत्या. दिनांक १७ मार्च १७५४ ला कुंभेरीच्या लढाईत राजे खंडेराव यांचा मृत्यू झाला. एक पराक्रमी योद्धा म्हणून खंडेरावांनी त्या काळात मोठा लौकिक मिळवला असला तरी इतिहासकारांनी मात्र त्यांची अकारण बदनामीच केलेली आहे. खंडेरावांच्या मृत्यूनंतर मल्हार बाबांनी आपल्या सुनेला म्हणजे माता अहिल्यादेवींना सती जाऊ दिले नाही. एवढेच नाही तर आपल्या विधवा सुनेच्या हाती राज्य कारभार देऊन जगाच्या इतिहासात कुठेच न घडलेले होळकरशाहीत घडवून दाखवले . होळकरशाहीचा कट्टर शत्रू माल्कमने अहिल्यादेवींबद्दल पुढील उद्द्गार काढले आहेत. अहिल्याबाईनी ज्या पद्धतीने २८ वर्ष प्रजादक्ष प्रशासन केले त्याला जगात तोड़ नाही. केवळ माळव्यातच नव्हे तर जिथे त्यांची राजवट नव्हती अशा सबंध हिन्दुस्थानातील प्रजा तिला दैवी अवतार मानते,याचे कारण म्हणजे अहिल्याबाईचे प्रजेवरील प्रेम आत्मशुद्धता व विकासाची कायम...