Posts

Showing posts from March, 2023

इंग्रजी वर्णनात्मक नोंदी

Solves the Activity by confience  Copies the Letters and words correctly Writes correctly on one line Listens with concentration  Reads the poem in rhythm Reads aloud from textbook  Reads and act accordingly  Reads the part in dialougs by understanding  Writes the answer of questions  Takes part in language game  Reads silently by understanding  Recites with enjoyment poems and songs  Gives responses in various contexts  identifies commonly used words  Rearranges the story events  Enjoys the rhythm and understand Takes the dictation of familiar words Reads english daily newspaper

गणित नमूल्यमापन नोंदी

गणित विषय नोंदी संख्या वाचन करतो लहान मोठ्या संख्या ओळखतो संख्याचा क्रम ओळखतो संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहितो बेरीज वजाबाकी गुणकार, भागाकार क्रिया समजून घेतो पाढे पाठांतर करतो गुणाकाराने पाढे तयार करतो संख्या अक्षरी लिहितो अक्षरी संख्या अंकात मांडतो संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो विविध भौमितिक संबोध समजून घेतो विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो गणितीय चिन्हे ओळखतो गणितातील सूत्रे समजून घेतो सूत्रात किंमती भरून उदाहरण सोडवितो भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ विविध परिमाणे समजुन घेतो

स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद जन्म : १२/१/१८६३ मृत्यू : ४/७/१९०२ स्वामी विवेकानंद यांचा जन्म दत्त नावाच्या घराण्यात झाला. विवेकानंदांना लहानपणी वीरेश्वर व नरेंद्र अशी नावे होती. लहानपणापासून त्यांची बुद्धी अत्यंत तल्लख होती. रामकृष्ण परमहंस या गुरूंच्या सहवासात त्यांचे आयुष्यच बदलून गेले. भारतात भूषणभूत असे जे अध्यात्मवादी धोर पुरुष होऊन गेले त्यांत स्वामी विवेकानंदांची गणना होते. पाश्चिमात्य राष्ट्रांना भारतीय संस्कृतीची व हिंदूधर्माची ओळख उकल देणारे ते पहिले भारतीय होत. त्यांनी भारतीय वेदान्ताची पताका जगभर फडकावली. शिकागोच्या सर्वधर्म परिषदेतील त्यांच्या भाषणामुळे त्यांचे नाव प्रसिद्ध झाले. १ मे १८९७ या दिवशी विवेकानंदांनी 'रामकृष्ण मिशन' ही संस्था स्थापन केली. "वा संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली. धर्म, अध्यात्म, तत्त्वज्ञान, भारतीय संस्कृती आणि भारतापुढचे आजचे प्रश्न यांवर त्यांनी दिलेली व्याख्याने आणि वेळोवेळी लिहिलेली पत्रे या सर्वांचा संग्रह विवेकानंद ग्रंथावलीच्या दहा खंडांतील सुमारे तीन हजार पृष्ठांमध्ये समाविष्ट आहे.

पंडित नेहरू

Image
पंडित नेहरू जन्म  १४/१२/१८८५ मृत्यू : २७/५/१९६४ मोतीलाल नेहरू हे भारताचे भाग्यविधाते, स्वातंत्र्यसंग्रामाचे नेते, जागतिक शांततेचे व आधुनिक भारताचे शिल्पकार होते. पंडित नेहरूंना लहान मुले अतिशय आवडत असत. मुळे त्यांना 'चाचा नेहरू' म्हणत. त्यांचा १४ नोव्हेंबर हा जन्मदिवस 'बालदिन' म्हणून भारतभर साजरा केला जातो. पंडितजींनी १९१२ मध्ये कैंब्रिज विद्यापीठातून बॅरिस्टरची पदवी मिळवली. १९२९ मध्ये लाहोर येथे झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते.१९४२ मध्ये 'छोडो भारत' या आंदोलनात त्यांना अटक झाली. त्यांना अहमदनगर किल्ल्यात तीन वर्ष स्थानबद्ध करण्यात आले. सप्टेंबर १९४६ मध्ये पंडितजींच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन करण्यात आले. १५ ऑगस्ट १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यावर ते भारताचे पहिले पंतप्रधान झाले. १९५५ मध्ये राष्ट्रपतींनी त्यांना 'भारतरत्न' हा किताब देऊन त्यांचा गौरव केला. पंडित नेहरूंनी 'दि डिस्कव्हरी ऑफ इंडिया' (भारताचा शोध) आणि 'ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री' (जागतिक दर्शन) लिहिले.पंडित नेहरू जागतिक शांततेसाठी...

वि. दा. सावरकर

Image
जन्म : २८/५/१८८३ मृत्यू : २६/२/१९६६ वि. दा. सावरकर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म नाशिक जिल्ह्यात मगर येथे झाला. बी.ए. झाल्यावर शिष्यवृत्ती मिळवून ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध क्रांतिकारक, हिंदुमहासभेचे राजकीय पुढारी व बुद्धिवादी सुधारक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ब्रिटिश राजसलेविरुद्धच्या चळवळीत भाग घेतल्याच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा झाली. नाशिक कटात भाग घेतल्याच्या आरोपावरून १९१० मध्ये त्यांना ५० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यांना लंडनहून भारतात आणण्यात येत असताना मार्सेलिस बंदराजवळ आगबोटीच्या पोर्ट होलमधून उडी मारून ते फ्रान्सच्या किनाज्यावर पोहत गेले. त्यांची ही उडी त्रिखंडात गाजलेली आहे. अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना, विदेशी कपड्यांची होळी, १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचा इतिहास, इटलीचा स्वातंत्र्यवीर जोसेफ मॅझिनी यांचे चरित्र, सामाजिक सुधारणा चळवळी, साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद या सावरकरांच्या जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी होत.

नेताजी सुभाषचंद्र बोस

Image
जन्म : २३/१/१८९७ मृत्यू : १८/८/१९४५ नेताजी सुभाषचंद्र बोस नेताजींचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी उडीसा राज्यातील कटक येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव सुभाषचंद्र जानकीनाथ बोस होते. रामकृष्ण परमहंस व विवेकानंद यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. स्कॉटिश चर्च कॉलेजातून ते पहिल्या वर्गात बी.ए. झाले. वडिलांच्या इच्छेनुसार इंग्लंडला जाऊन ते आय.सी.एस. झाले. परकीय राज्यकर्त्यांच्या हाताखाली नोकरी करावी लागणार हे लक्षात येताच त्यांनी राजीनामा दिला व ते भारतात परत आले. जर्मनी आणि जपान या देशांशी संधान सांधून त्यांनी सिंगापूर येथे 'आझाद हिंद सेनेचे' नेतृत्व स्वीकारले. 'चलो दिल्ली' व 'जयहिंद' या दोन घोषणा त्यांनी आपल्या सैन्याला दिल्या. ते 'नेताजी' म्हणून ओळखले जाऊ लागले. १९३८ व १९३९ मध्ये झालेल्या हरिपुरा व त्रिपुरा या काँग्रेस अधिवेशनांचे ते अध्यक्ष होते. पुढे त्यांनी 'फॉरवर्ड ब्लॉक' नावाचा पक्ष काढला. देशभक्ती, धडाडी, संघटन कौशल्य, समयसूचकता व मुत्सद्देगिरी हे गुण त्यांच्या अंगी होते.

आकारिक /संकलित मूल्यमापन कसे करावे

Image
खालील मूल्यमापन नमुना स्वरूपात दिलेले आहे काही बाबींमध्ये लवचिकता ठेवता येते.

रवींद्रनाथ टागोर भाषणे

Image
जन्म : ७/५/१८६१ मृत्यू : ७/८/२९४१ गुरुदेव रवींद्रनाथ टागोर गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म कोलकता येथे ७ मे १८६१ रोजी झाला. बंगाली व संस्कृत या भाषांचा अभ्यास त्यांनी घरीच केला. १८८१ मध्ये त्यांनी प्रतिभा' हे पहिले संगीत नाटक लिहिले. 'साधना', 'भारती', 'बंगदर्शन' या मासिकांचे त्यांनी संपादन केले. त्यांचा विवाह मृणालिनी देवीशी झाला. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे विशाल प्रतिभेचे व व्यापक दृष्टीचे महापुरुष होते. 'गीतांजली' या काव्यग्रंथाला मिळालेल्या नोबेल पारितोषिकामुळे ते विश्वविख्यात झाले. त्याचप्रमाणे 'जन गण मन' या त्यांच्या काव्याला राष्ट्रगीताचा दर्जा 'मिळाल्यामुळे ते 'राष्ट्रकवी' म्हणून ओळखले जातात. रवींद्रबाबूंनी स्थापन केलेल्या 'शांतिनिकेतन' व 'विश्वभारती' या संस्थांनी शिक्षणक्षेत्रात मोलाचे कार्य केले. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे कवी, कादंबरीकार, कथाकार, नाटककार, विचारवंत, होते. 'रवींद्रसंगीत' ही त्यांची भारतीय संगीताला देणगी आहे.

गुढीपाडवा सणांची माहिती

             *गुढीपाडवा सण माहिती*    गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो. होळीचे दहन झाल्यानंतर वातावरणातील तापमान वाढू लागते. या वातावरणातील बदलामुळे त्वचेचे विकार, पोटाचे विकार, सर्दी-खोकला आदी आजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा वातावरणात शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि शरीराचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला कडुनिंबाचे सेवन केले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंब आणि गूळ खाण्याची प्रथा जुन्या काळापासूनच चालत आली आहे. कडुनिंब आणि गुळात अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत. जे शर...

महिला दिन

              महिला  दिन  भाषण दरवर्षी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन अर्थात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. महिला दिनानिमित्त अनेकदा शाळेत वक्तृत्व स्पर्धा (भाषण स्पर्धा), निबंध स्पर्धा यांचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत महिला दिनाशी संबंधित माहितीचा आपण उपयोग करू शकता. यासाठीच हे जागतिक महिला दिनाचे मराठी भाषण... ज्याला स्त्री आई म्हणून कळली, तो जिजाऊचा शिवबा झाला ज्याला स्त्री बहिण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला. इतिहासात डोकावलात तर मार्च 1908 मध्ये न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो महिला कामगारांनी रूटगर्स चौकात जमून ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता य मागण्या केल्या. नंतर 1910 मध्ये "कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या आंदोलनाच्या स्मरणार्थ हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारण्याचा ठराव झाला शिवरायांच्या स्वराज्य स्थापन करण्यामागील प्रेरणा असणाऱ्या माता ...